एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकपैसे अंडरवर्ल्डमधून यायचे, दाऊद इब्राहिम बॉलिवूडला पोसायचा...; दिग्गज अभिनेत्रीनं पितळं उघडं पाडलं
Anu Aggarwal Exposed Bollywood: 1990 च्या रोमँटिक हिट चित्रपट 'आशिकी'द्वारे प्रसिद्धी मिळवलेल्या अनु अग्रवाल यांनी 1990 च्या दशकातील बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील घाणेरड्या संबंधांबद्दल उघडपणे सांगितलं.
By : नामदेव जगताप|Updated at : 19 May 2025 08:57 AM (IST)
Anu Aggarwal Exposed Bollywood
Source :
ABP MajhaAnu Aggarwal Exposed Bollywood: 1990 च्या दशकातली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीनं (Bollywood Actress) नुकताच एक धक्कादायक खुलासा करत संपूर्ण इंडस्ट्रीचं पितळ उघडं पाडलं आहे. तिनं सांगितलं की, त्यावेळी बॉलिवूड सिनेमांसाठी (Hindi Movies) पैसे अंडरवर्ल्डमधून (Underworld) यायचे. अनेक चित्रपटांवर दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) सारख्या अंडरवर्ल्डच्या लोकांचं नियंत्रण होतं. 90 च्या दशकातील सुपरडुपर हिट सिनेमा 'आशिकी'मधून (Aashiqui) झळकलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Aggarwal) यांनी इंडस्ट्रीची काळी बाजू सर्वांसमोर मांडून धक्का दिला आहे. तिनं सिनेसृष्टीचं धक्कादायक वास्तव सर्वांसमोर उघड केलं आहे.
1990 च्या रोमँटिक हिट चित्रपट 'आशिकी'द्वारे प्रसिद्धी मिळवलेल्या अनु अग्रवाल यांनी 1990 च्या दशकातील बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील घाणेरड्या संबंधांबद्दल उघडपणे सांगितलं. त्या काळाची आठवण करून देताना अनु अग्रवाल यांनी त्या काळातील इंडस्ट्रीची काळी बाजू सर्वांसमोर उघड केली. त्यांनी इंडस्ट्री अत्यंत घाणेरडी असल्याचं सांगितलं आणि त्याकाळात अनेक फिल्म अंडरवर्ल्डच्या हिशोबानं चालत असल्याचंही सांगितलं. इंडस्ट्रीच्या सध्याच्या स्थितीबाबत माहीत नसल्याचंही अनु अग्रवाल यांनी बोलताना सांगितलं. पण, एकंदरीत त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे संपूर्ण सिनेसृष्टी हादरली असून खळबळ माजली आहे.
इंडस्ट्रीवर दाऊद इब्राहिमचा कंट्रोल
अनु अग्रवाल यांनी सांगितलं की, "सर्व पैसे अंडरवर्ल्डमधून आले होते.' पिंकव्हिलाशी बोलताना, अनु अग्रवाल यांनी 90 च्या दशकात हिंदी चित्रपट उद्योगाशी अंडरवर्ल्ड किती खोलवर जोडलं गेलंय, याबाबत सांगितलं. त्यांनी खुलासा केला की, त्या काळातील बहुतेक चित्रपट ऑफ-द-रेकॉर्ड डीलद्वारे बुक केले जात होते, ज्यावर दाऊद इब्राहिमसारखी अंडरवर्ल्डची माणसांचा कंट्रोल असायचा.
अनु अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी बॉलिवूडमध्ये येणारे जवळपास सर्वच पैसे अंडरवर्ल्डशी निगडीत होते. जे पूर्णपणे वेगळ्या नियमांखाली चालणाऱ्या उद्योगाचं चित्र रंगवतं. 'आशिकी' चित्रपटातील पदार्पणानं अनु अग्रवाल रातोरात नॅशनल क्रश बनल्या होत्या. त्यांना एका रात्रीत मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पण या प्रसिद्धीची किंमत त्यांनाही मोजावी लागली होती.
शाहरुख खानच्या शेजारी होत्या अनु अग्रवाल
90 च्या दशकात लाखो चाहत्यांच्या दिलाची धडकन असलेली अनु अग्रवाल अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. त्या काळाची आठवण करून देताना अनु अग्रवाल म्हणाल्या की, एका रात्रीत त्यांना एवढी प्रसिद्धी मिळालेली की, त्यांची सुरक्षा अनेकदा धोक्यात असायची. चाहते त्यांच्या इमारतीबाहेर तळ ठोकून असायचे. काहीजण तर त्यांच्या घराती एक झलक पाहण्यासाठी परदेशातून यायचे. सुदैवानं त्या एका एमएलए-एमपी असलेल्या बिल्डिंगमध्ये राहत होत्या. ज्यामध्ये मोठी पोलीस सिक्युरिटी होती.
दरम्यान, अनु अग्रवाल यांनी त्या काळाची तुलना सध्या शाहरुख खानला मिळणाऱ्या अटेंशनसोबत केलेली. त्यांनी म्हटलं की, त्यावेळी त्या शाहरुख खानच्या शेजारी होत्या. 'आशिकी' च्या प्रचंड यशानंतर, अनु अग्रवाल यांनी गजब तमाशा, किंग अंकल, राम शास्त्रसह इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण, 1999 मध्ये झालेल्या एका दुर्दैवी कार अपघातानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. इंडस्ट्रीपासून त्या दुरावल्या गेल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ना दीपिका, ना रश्मिका अन् ना समंथा, साऊथच्या 'या' सौंदर्यवतीनं दिलेली पहिली हजार कोटींची हिट फिल्म; आज कोट्यवधींच्या साम्राज्याची मालकीन
Published at : 19 May 2025 08:57 AM (IST)
Tags :
Underworld Aashiqui Anu Aggarwal Dawood Ibrahim BOLLYWOOD
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य
Opinion